रोटरी क्लब रत्नागिरीने फुलवला अपंग तरुणाच्या जीवनात आनंद
संजय रमेश ठाकरे,वय वर्षे २७ मूळगाव देवास, मध्यप्रदेश, व्यवसायानिमित्त रत्नागिरीत राहत होता.रेल्वेतून प्रवास करताना पनवेल येथे त्याचा अपघात झाला.या अपघातात त्यांचा डावा हात कोपराहून व डावा पाय गुडघ्यापासून काढावा लागला होता.सायन मुंबई येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर अपंग अवस्थेत उदरनिर्वाह करणेही त्यांना जड जात होते.माहेर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांची समस्या रोटरी क्लब रत्नागिरीचे माजी अध्यक्ष विजय पवार यांच्याकडे आली असता
चिपळूण रोटरी क्लबने आयोजित केलेल्या शिबीरामध्ये संजय ठाकरे यांना स्वतः घेऊन गेले.त्यासाठी त्यांना रेल्वे पोलीस पी.एस.आय अधिकारी पदावर काम करणाऱ्या सौ.प्रतिभा साळुंखे यांची मदत मिळाली.चिपळूण रोटरी क्लबने संजय यांना कृत्रीम हात व पाय बसवून दिला त्यामुळे ठाकरे आता स्वतः उभे राहतात,काठीच्या आधाराने चालू शकतात. रत्नागिरी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी या अपंग तरुणाला व्हीलचेअर रोटरी क्लब तर्फे दिली व त्यांना रोजगार मिळवून देण्याची ग्वाही दिली.रोटरी डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी किशोर लुल्ला यांनी रत्नागिरी क्लबच्या सर्व रोटरी सदस्यांचे कौतुक केले.