राष्ट्रवादीचा धामापूर जिल्हा परिषद गटाचा मेळावा उत्साहात

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील धामापूर जिल्हा परिषद गटाचा मेळावा शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सभागृहात झाला. या मेळाव्यात पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
सभागृहातील व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरानी आ. शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीबद्दल गौरवोद‍्गार काढले. विविध योजनेंर्तगत अल्प कालावधीत 328.71 कोटीचा निधी मंजूर करत आणला व नियोजनबद्ध खर्च करुन गावा-गावाचा विकास करत एक आदर्श नेतृत्वाचा ठसा उमटवला. तसेच आगामी काळात जल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक तयारीबाबत सूचना करण्यात आल्या व एकमताने धामापूर जि. प. गटावर राष्ट्र्वादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी आ. निकम यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तीन वर्षामध्ये महामारी, नैसर्गिक आपत्तीना तोंड देत जी निवडणूक काळात मतदार संघात आश्‍वासने दिली गेली ती बर्‍याचशा प्रमाणात पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काही कामे झाली नसतील दुर्लक्षीत राहिली असतील ती नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. या मेळाव्यात उपस्थित राहून जो विश्‍वास दाखवलात तसेच माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन नवयुवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलात त्याबद्दल आभार मानले.
या भव्य मेळाव्यात नुतन प्रवेशकर्ते अजित मोरे, अमित जड्यार, रोहित दर्डे, रोशन काळबी, अविनाश काळबी, राज काळबी, अनिकेत काळंबी  यांच्या हातात राष्ट्रवादी चा झेंडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी पं. स. सभापती चिपळूण पूजा निकम, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राजेंद्र सुर्वे, तालुकाध्यक विवेक शेरे, तालुका सचिव राजेंद्र पोमेडकर, जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी गजानन सुर्वे, जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा अंकिता चव्हाण पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button