
जिल्ह्यातील शाळांमध्ये 1 ऑगस्ट रोजी भारतमाता पूजन
रत्नागिरी : जिल्हाभरातील शाळांमध्ये भारतमाता पूजन करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी व शिक्षक परिषद रत्नागिरी या संस्थेतर्फे घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीमध्ये शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा दि. 24 रोजी झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कोकण विभागीय अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष एस. एस. पाटील, कार्याध्यक्ष किरण देशपांडे, सेक्रेटरी पी. एम. पाटील, कोषाध्यक्ष निंगोजी पाटील त्याचप्रमाणे या सभेला रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजेश आयरे, खेड तालुका अध्यक्ष विजय म्हस्के, चिपळूण तालुकाध्यक्ष सोमनाथ सुरवसे, कोत्रे व पुराणिक उपस्थित होते. याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शालेय उपक्रम सभासद नोंदणी, शिक्षणाधिकार्यांच्या समवेत सभा व शिक्षकांचे प्रश्न, जिल्हा मेळावा 10 डिसेंबरला 2022 ला आयोजित करणे अशा विविध विषयांवर व विविध प्रश्नांवर चर्चा झाली. अनेक शिक्षकांनी शिक्षक परिषदेच्या मार्फत सभासद नोंदणी करण्याची आवश्यकता व्यक्त
केली.
भारतमातेच्या प्रतिमा जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांना वितरित करण्यासाठी शिक्षकांना वितरीत करण्यात आल्या. अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम करताना भारत मातेप्रति शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य व शिक्षणामधून भारताविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा करण्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान करणार्या आपल्या पूर्वजांचे यावेळी स्मरण करण्यात यावे आणि अशा प्रकारचा एक देशभक्तीपर कार्यक्रमाची रचना दि. 1 ऑगस्टला माध्यमिक शाळांमध्ये करण्यात यावी असे सूर्यवंशी यांनी सांगितले. विजय मस्के यांनी आभार
मानले.