आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने कुंभार्ली येथील आदिवासी भागात भाजपकडून लाडू वाटून आनंदोत्सव
चिपळूण : राष्ट्रपती म्हणून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने संपूर्ण देशभर जल्लोष सुरू आहे. भाजपा चिपळूणच्यावतीने तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार्लीतील आदिवासी वस्तीत जाऊन तेथील नागरिकांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांच्या सोबत गप्पा-गोष्टी करत अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थ गौरेश निकम, रघुनाथ हिलम, युवा कार्यकर्ते मंगेश हिलम , दीपक हिलम, संतोष हिलम, चंद्रकांत जाधव,दत्ताराम वाघमारे व महिला उपस्थित होत्या. युवा कार्यकर्ते मंगेश हिलम यांनी रस्ता, प्रत्येक कुटुंबाला घरे मिळावी, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तसेच आज आमचा हक्काचा माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याने आमचा सर्वांगीण विकास होईल , अशा प्रकारच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोजने यांनी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी कटिबद्ध आहोत, असे सांगितले.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभय चितळे, नव्याने पक्षात सामील झालेले पोफळीचे श्रीराम पवार, तालुका उपाध्यक्ष संजय पंडव,तालुका चिटणीस मधुकर फके, शक्तीकेंद्र प्रमुख राजेंद्र जाधव, शिरगाव शक्तीकेंद्र प्रमुख अतिश सोनकर, माजी पोलीस पाटील शशिकांत लब्धे, कामगार आघाडी सहसंयोजक शैलेश लब्धे, बुथ प्रमुख विजय सातपुते, योगेश नलावडे ,प्रजोत सावर्डेकर, साहिल ताम्हणकर उपस्थित होते.