
स्वतःच्या मरणास व प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या रिक्षा चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
रत्नागिरी ते पावस रस्त्यावर गोळपधार येथे रिक्षा निष्काळजीपणे चालवून अपघात झाला. स्वतःच्या मरणास व प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या रिक्षा चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार राजाराम मोहिते (वय ४७, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयित मृत चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी दीडच्या सुमारास गोळपधार येथे घडली.




