नगरसेवकांवरून वाद पेटला ,ते दोन नगरसेवक विकासकामांची चर्चा करण्यासाठी गेले होते- आमदार राजन साळवी

0
149

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून रत्नागिरीचे विद्यमान आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे रत्नागिरीतील नऊ शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्रे करून मूळ शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे शिवसेनेचे उपनेते व आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले असतानाच काल रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आमदार उदय सामंत यांच्या भेटीला वीस नगरसेवक गेल्याचा दावा सामंत यांनी केला होता त्याचा फोटो व व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता मात्र आता शिवसेनेचे उपनेते व आमदार राजन साळवी यांनी खुलासा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये त्यानी अजूनही नऊ नगरसेवक शिवसेनेबरोबर असल्याचा दावा केला आहे उदय सामंत यांच्याबरोबर मिटींगमध्ये गेलेले बंटी कीर व बाबा नागवेकर हे नगरसेवक विकासाच्या कामांसाठी चर्चा करण्यासाठी तेथे गेले होते असे सांगितले नगरसेवक शिवसेनेत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे
आता या सर्व प्रकारावरून नगरसेवकच आता द्विधा मन स्थितीत असल्याचे दिसत आहे आगामी येणारी नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी या पेचात ते सापडल्याचे सध्या तरी दिसत आहेत
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here