
लसीकरण व वाढलेल्या शस्त्रक्रियांमुळे मुंबईसह राज्यात रक्ताचा तुटवडा
मुंबईत आता रक्ताचा तीव्र तुटवडा भासू लागला आहे. मुंबईत सुरू असलेले लसीकरण शिवाय, वाढलेल्या शस्त्रक्रियांमुळे मुंबईत तीव्र रक्त तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रभारी डॉ. अरुण थोरात यांनी साांगितले की, “संपूर्ण महाराष्ट्रात सध्या फक्त 22 हजार युनिट रक्तसाठा आहे. तेच आधी या कालावधीत 40 ते 50 हजारांहून अधिक युनिट रक्तसाठा असायचा. म्हणजेच, जवळपास अर्ध्यावर रक्तसाठा आला आहे. तर, मुंबईत फक्त 3,200 युनिट एवढाच रक्तसाठा आहे. जो साधारणपणे 5 हजारांपर्यंत असतो”
“कोविड -19 महामारी आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे रक्तदानास अडथळा निर्माण झाला आहे
www.konkantoday.com