नेस्ट २०२५ परीक्षा!!

१२ वी विज्ञान (पीसीबीएम् विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी प्रवेश. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट-२०२५ ( NEST-२०२५) बेसिक सायन्सेस-बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समधील ५ वर्षे इंटिग्रेटेड एम्.एस्सी. प्रोग्रॅम (२०२५-३०) साठी प्रवेश परीक्षा जाहीर.

यातून मुंबई विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस (UM- DAE CEBS) मुंबई (प्रवेश क्षमता एकूण ५७ (अजा – ९, अज – ४, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २३)) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयएसईआर), भुवनेश्वर (प्रवेश क्षमता २००) मध्ये प्रवेश दिले जातात. परीक्षा केंद्र – ५ वर्षांच्या इंटिग्रेटेड एम्.एस्सी. प्रोग्रॅमसाठी प्रवेश परीक्षा २२ जून, २०२५ रोजी. छ. संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर, जळगाव इ. देशभरातील १४० केंद्रांवर घेतली जाणार.

*स्कॉलरशिप : निवडलेल्या उमेदवारांना रु. ६०,०००/- वार्षिक स्कॉलरशीप DISHA प्रोग्रॅमसाठी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीतर्फे दिली जाईल. शिवाय ईंटर्नशिपसाठी दरवर्षी रु. २०,०००/- दिले जातात.पात्रता : २०२३, २०२४ मध्ये १२ वी (बायोलॉजी/ केमिस्ट्री/ फिजिक्स/ मॅथ्स) या विषयांसह किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण किंवा २०२५ ला १२ वी (विज्ञान) परीक्षेला बसणारे उमेदवार पात्र आहेत. (अजा/ अज/ दिव्यांग यांना ५५ टक्के गुण आवश्यक) आणि उमेदवारांनी NEST-2025 गुणवत्ता यादीत नंबर मिळविणे आवश्यक.*वयोमर्यादा : कोणतीही वयाची अट नाही.*परीक्षा पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड् ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ज्यात बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या चार विषयांच्या ११ वी/१२ वी NCERT/ CBSE अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी ६० गुण (४ विषयांपैकी बेस्ट ऑफ थ्रीनुसार १८० गुणांमधून) NISER आणि UM- DAE CEBS साठी वेगवेगळी मेरिट लिस्ट बनविली जाईल. NEST परीक्षेचा निकाल www. nestexam. in या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. NEST परीक्षेचा अभ्यासक्रम https:// ncert. nic. in/ rationalized- content. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अर्जाचे शुल्क : खुला, ईडब्ल्यूएस् व इमाव गटांतील पुरुष उमेदवारांसाठी रु. १,४००/- (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला यांना रु. ७००/-).कोर्सविषयी विस्तृत माहिती www. niser. ac. in आणि www. cbs. ac. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ॲडमिट कार्ड २ जून २०२५ पासून NEST च्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल.

ऑनलाइन अर्जात बदल करण्यासाठी Correction & update window दि. १०-१४ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.हेल्पलाईन नं. ०२२६१३०६२६६ई-मेल आयडी – nest- exam@niser. ac. in.या प्रोग्राममधून अतिउत्तम कामगिरी करणारे उमेदवार BARC ट्रेनिंग स्कूलच्या ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर पदांच्या निवडीसाठी होणाऱ्या इंटरव्ह्यूकरिता पात्र ठरतील.मॉक टेस्ट संकेतस्थळावर दि. १६ मे २०२५ पासून उपलब्ध केल्या जातील.ऑनलाइन अर्ज www. nestexam. in या संकेतस्थळावर दि. ९ मे २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button