
माणगांव खूनातील संशयितांचे रत्नागिरीतून गोव्याकडे पलायन.
रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे मित्राचा खून करून पसार असलेल्या दोघे संशयित रत्नागिरीत रेल्वेस्थानकावर उतरल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दोन्ही आरोपी स्टेशनवर उतरल्यानंतर गुठे गेले, याचा शोध रेल्वे पोलिसांबरोबरच रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत होता. दरम्यान खून केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही संशयितांनी रत्नागिरी रेल्वेस्थानक येथून गोव्याकडे जाणारी ट्रेन पकडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.पोलिसांना अद्याप या दोघा तरूणांची ओळख पटली नसून ते परराज्यातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ११ सप्टेंबर रोजी या दोघा तरूणांबरोबरच आणखी एक त्यांचा मित्र माणगाव येथे आला होता. या ३ मित्रांमध्ये वाद होवून एकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर हे दोन्ही संशयित आपल्या मित्राला तशाच अवस्थेत सोडून फरार झाले होते. www.konkantoday.com