शासकीय निवासस्थानावरुन घेतल्या जाणाऱ्या बैठकांना घरातल्या बैठका समजल्या जातात का?-परिवहन मंत्री अनिल परब

उद्धव ठाकरे हे घराबाहेर न पडलेले राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. दरेकर यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘कोणी सांगितलं मुख्यमंत्री घरात आहेत? मुख्यमंत्री आता वर्षा बंगल्यावर बसून बैठका घेत आहेत. हे कुणाला दिसत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठका होत आहेत. शासकीय निवासस्थानावरुन घेतल्या जाणाऱ्या बैठकांना घरातल्या बैठका समजल्या जातात का? याला घरात बसून बैठका म्हणत असतील, तर मग आत्तापर्यंत त्यांनी तरी कुठे बैठका घेतल्या. वर्षा बंगल्यावर बसूनच बैठका घेतल्या ना,’ असं अनिल परब म्हणाले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button