
चिपळूण शहरातील मटण-मच्छी मार्केट दुरूस्ती अंतिम टप्प्यात
चिपळूण शहरातील मच्छी-मटण मार्केट दुरूस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या रंगकाम सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात गाळे लिलावाच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
अनेक कारणांमुळे गेल्या २० वर्षापासून पडीक असलेल्या मच्छी-मटण व भाजी मंडईमुळे नगर परिषदेचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी मुख्याधिकारी भोसले यांनी हे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी व्यावसायिकांच्या अनेक बैठका घेतल्या. यावेळी व्यावसायिकांनी दोन्ही प्रकल्पांमधील असुविधा, ना परतावा मोठी अनामत रक्कम, बाजारभावापेक्षा अधिक असलेले भाडे आदी बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. तसेच लिलावापूर्वी दोन्ही प्रकल्पांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.
www.konkantoday.com