सतीश वाघ यांचा पुरस्काराने सन्मान

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांचा टाइम्स  ग्रुपच्या वतीने टाइम्स व्हिसीनरी लीडर्स 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रुपचे डेप्युटी चिफ मॅनेजर प्रथमेश केळकर यांच्या हस्ते वाघ यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सतीश वाघ हे गेली अनेक वर्षे रासायनिक उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सुप्रिया लाइफ सायन्स या रासायनिक कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. सामाजिक कार्यामध्येही सिंहाचा वाटा असून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबईतील जुहू येथील नोवोटेल हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला. त्यांचे  सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button