चिपळुणात बॅनरवरून शिवसेनेत वाद उफाळण्याची शक्यता

चिपळूण : शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी भर बाजारपेठेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावलेल्या बॅनर वरून वाद रंगला आहे. बुधवारी रात्री शिवसैनिकांनी हा बॅनर काढला त्यामुळे काही काळ बाजारपेठेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सकाळी पुन्हा तोच बॅनर त्याच ठिकाणी झळकला. या बॅनरला पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता त्यामुळे आता शिवसेनेत वादाची शक्यता आहे.
गेले महिनाभर शिवसेनेअंतर्गत संघर्ष सुरू आहे शिंदे गट विरुद्ध उद्धव गट यांच्यामध्ये राज्य पातळीवर संघर्ष पेटला आहे हा वाद टोकाला जात असून शिवसेना नक्की कोणाची इथपर्यंत हा वाद गेला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर मात्र अखंड शिवसेनेचा बॅनर झळकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. संभ्रम पसरू नये म्हणून शिवसैनिकांनी रात्री हा बॅनर काढला. या ठिकाणी तत्काळ पोलीस बंदोबस्त देखील दाखल झाला. जिल्हा प्रमुखांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी हा बॅनर काढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गुरुवारी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी बॅनर झळकलेला पहायला मिळाला. बॅनरच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button