रत्नागिरीसाठी शासकीय मेडीकल कॉलेजला मंजुरी, समितीही गठीत : आ. उदय सामंत

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली असून, समितीही गठीत करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याने, जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांचा प्रश्‍नही सुटणार आहे. जिल्हा रुग्णालयातील भुलतज्ज्ञांचा प्रश्‍न सुटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. उदय सामंत यांनी सांगितले.
माजी मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौर्‍यावर आले असता त्यांनी विविध विकासकामांबाबत आढावा घेतला. याचवेळी मोठ्या संख्येने रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी आ. सामंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाली येथील निवासस्थानी अनेक पदाधिकारी व नागरिकांनी त्यांची भेट घेतली. दुपारनंतर आ. सामंत हे रत्नागिरीतील विश्रामगृहावर आले होते. आ. सामंत यांनी रत्नागिरीत आल्यानंतर बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह विविध विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. विकास कामांबरोबरच जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईतील अधिकार्‍यांशी संपर्क करीत, डॉक्टरांची संख्या वाढावी यादृष्टीने आढावा घेतला. आ. सामंत यांच्या दौर्‍यामुळे रत्नागिरीतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button