बनावट दागिने बँकेत ठेवून घेतले 22 लाख 80 हजारांचे कर्ज; सुवर्णकार व इतर चौघांना अटक, एकजण फरार

रत्नागिरी : बनावट दागिने बँकेत ठेवून बँकेची सुमारे 22 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना कारवांचीवाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये घडली. फसवणुकीची ही घटना 21 जानेवारी 2019 ते 23 मार्च 2022 या कालावधीत घडली. या प्रकरणी 5 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. बँकेच्या रजिस्टर्ड व्हॅल्युअर सुवर्णकारासह अन्य तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यातील एकजण फरार आहे. यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत केली.
आकाशानी जनार्दन कांबळे (वय 50), शुभम जनार्दन कांबळे (वय 24, दोन्ही रा. रवींद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी), जयवंत सखाराम मयेकर (49, रा. पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी), प्रदीप श्रीपाद सागवेकर (वय 51, राहणार कीर्तीनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर सलीम हुसेन निंबल (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांच्याविरोधात दि. 21 जुलै 2022 रोजी शाखा व्यवस्थापक अमिता राजेश झगडे (वय 36, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार प्रदीप सागवेकर हा या बँकेत गेली 18 वर्षांपासून रजिस्टर्ड व्हॅल्युअर सुवर्णकार म्हणून काम करत आहे. त्याने सलीम निंबल, आकाशानी कांबळे, शुभम कांबळे, जयवंत मयेकर यांच्याकडील दागिने हे बनावट असल्याचे माहीत असूनही ते सोन्याचे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले. त्या आधारे संशयितांनी संगनमताने बँकेतून एकूण 22 लाख 80 हजार 500 रुपयांचे कर्ज घेतले. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button