गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार.?”, असीम सरोदेंचा गंभीर आरोप

अॅड. असीम सरोदे यांनी रविवारी धाराशीमध्ये झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेमध्ये बोलताना शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. तसेच, यासंदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही असीम सरोदेंनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या आरोपांवर अद्याप शिंदे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी ‘निर्भय बनो’ सभा पार पडली. यावेळी असीम सरोदेंनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं? यासंदर्भात काही दावे केले आहेत. “गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?” असा सवाल असीम सरोदेंनी उपस्थित केला आहे.दरम्यान, असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा यावेळी भाषणात उल्लेख केला.गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही”, असं असीम सरोदे उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button