वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाख अकरा हजारांची ऑनलाईन फसवणूक
आपले वीजबिल अपडेट झालेले नाही असे सांगून एक अॅप डाऊनलोड करायला सांगून रत्नागिरीतील सविता नाटेकर वय ५९ राहणार नाचणेरोड या महिलेची दोन लाख अकरा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे याबाबत राहुल चतुर्वेदी व दीपक शर्मा या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातील फिर्यादी सविता नाटेकर यांना आरोपीने फोन करून आपले वीजबिल अपडेट झालेले नाही यासाठी आपण प्ले स्टोअरमधून क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करा असे सांगितले त्याचप्रमाणे फिर्यादी यांनी हे अॅप डाऊनलोड केले त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडून कस्टमर आयडी व अन्य माहिती मागून घेतली त्यानंतर त्यांच्या खात्यांमधून दोन लाख अकरा हजार रुपये काढून घेऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक केली याबाबत त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com