मासे पकडणे बेतले जीवावर; नांदिवडे येथे मासे गरवताना तरूण समुद्रात बेपत्ता
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे येथील समुद्रात मासे गरवताना तरूण पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून ही घटना बुधवार (20 जुलै) रोजी सकाळी 10 वा. सुमारास घडली आहे. बेपत्ता तरुणाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.
अंकुश रामचंद्र भूते (वय 45, रा. कुणबीवाडी नांदिवडे जयगड, रत्नागिरी) असे प्रौढाचे नाव आहे. याबाबत सर्वेश सुरेश तेरेकर (वय 30, रा. कुणबीवाडी नांदिवडे जयगड, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी सर्वेश तेरेकर यांनी अंकुश भूते याला नांदिवडे येथील समुद्रात मासे गरवताना पाहिले होते. परंतु, त्यानंतर काही वेेळाने सर्वेश तेरेकर यांना अंकुश पाण्यामध्ये बुडताना दिसला. त्यावेळी ते त्याला वाचवण्यासाठी पाण्यात त्याच्या दिशेने उतरले पण पाण्याला करंट असल्याने त्यांनाही मदत करता आली नाही. दरम्यान, अंकुश समुद्राच्या लाटांमध्ये ओढला गेला आणि दिसेनासा झाला होता .त्याचा शोध घेतल. मात्र तो सापडला नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक मोेंडे करीत आहेत.