पोलिस अधीक्षक गर्ग यांनी घेतला स्कूल बस यंत्रणेचा आढावा
रत्नागिरी : पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी दुपारी सर्वंकष विद्या मंदिर (एसव्हीएम) या शाळेला वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांच्यासह भेट दिली. यावेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाणार्या स्कूल बसेसचा आढावाही घेण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग हे स्कूल बस सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत. या नात्याने त्यांनी मंगळवारी दुपारी स्कूल बसमध्ये जाउन विद्यार्थ्यांशी, स्कूल बस ड्रायव्हर व शिक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी बसमधील सीसीटीव्ही व जीपीएस यंत्रणेचीही पाहणी त्यांनी केली. बसमध्ये विद्यार्थ्यांकरता केअरटेकर अटेंडंट पुरविले जातात का याचाही आढावा त्यांनी घेतला. तसेच विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना चॉकलेट देत रस्ता सुरक्षित व वाहतुक नियमन पाळण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वंकष विद्या मंदिरचे प्राध्यापक व इतर शिक्षक उपस्थित होते.