पावस नदीकिनारी जुगार अड्डयावर पोलिसांची धाड
रत्नागिरी : तालुक्यातील पावस नदीकिनारी बेकायदा जुगार अड्डयावर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी धाड टाकली. यात रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य असा एकूण 1 हजार 305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विक्रम उर्फ विकी वसंत पवार (31, रा. मेर्वी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस नाईक प्रवीण नाईक यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस हवालदार चव्हाण करत आहेत.