
मी खासदारकी नाही, तर विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक-मंत्री दीपक केसरकर
मी खासदारकीसाठी इच्छूक नाही. त्यामुळे माझा कोणीही कितीही अपप्रचार केला, तरी मी विधानसभा लढवणार आहे. तसे आमचे युतीचे ठरले आहे, अशी भूमिका शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज ( दि.११) सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केली
दरम्यान, जे कोणी अपप्रचार करीत आहे ते “इनोसंट” आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, टीकाही करणार नाही, असे सांगून जो कोणी लोकसभा लढवेल, त्याला निवडून आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, आणि ५० हजारांचे लीड मिळवून देईल, असेही केसरकर म्हणाले.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले की, आपण आगामी काळात विधानसभा लढवणार आहोत. कोणी खोटा प्रचार करत असेल तर त्यांना एवढेच सांगतो, मी खासदारकी नाही, तर विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. तूर्तास मी खासदारकीची कोणती इच्छा व्यक्त केलेली नाही. पुढच्या टर्मला खासदारकीबाबत विचार करता येईल, परंतु असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. जे माझ्यावर टीका करत आहेत, ते इनोसंट आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काय बोलणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला
www.konkantoday.com




