
सिंगापूर येथील कंपनीचा तेल वाहतूक करणारा बार्ज कलंडून भरकटल्याने जयगड किनारी लागण्याची शक्यता
सिंगापूर येथील कंपनीचा तेल वाहतूक करणारा बार्ज कलंडून भरकटल्याने जयगड किनारी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे
सिंगापूर येथील कंपनीचे २२ जूनला कोलंबो येथून निघालेल्या बार्जचा कलंडल्याने त्याच्या मुख्य टगशी समुद्रातील संपर्क तुटला होता. तर ९ जुलै पासून रडारवरील त्याची पॉझिशन सुद्धा दिसतं नव्हती.त्याचा शोध सुरु असतानाच त्याचे लोकेशन रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खोल समुद्रात किनाऱ्यापासून काही नॉटिकल माईल्स वर आढळून आले आहे.
या तेलवाहू बार्जचा काही धोका नसला तरीही हे बार्ज किंवा त्याचा भाग जयगड बंदराच्या उत्तरेकडे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि संबंधित यंत्रनेला संपर्क करावं असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com