भाट्ये येथे शेजाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

रत्नागिरी : शहरालगतच्या भाटये येथील जामा मशिदीजवळ दोन शेजार्‍यांमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत प्रौढ पती-पत्नी जखमी झाले आहेत. शब्बीर हसन भाटकर (वय 56), जुबेदा शब्बीर भाटकर (वय 53, दोन्ही रा. माजा मशिदजवळ भाटये) असे जखमी झालेल्या दोन प्रौढांची नावे आहेत. याबाबत शब्बीर हसन भाटकर यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित हशमत हमिद भाटकर, निजार हशमत भाटकर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर भाटकर यांच्या घराच्या शेजारी राहणार्‍या हशमत आणि निजार यांनी त्यांच्या घराच्या बाजूने जाणार्‍या सार्वजनिक गटारामध्ये माती टाकल्यामुळे त्या गटारातून जाणारे पावसाचे पाणी शब्बीर यांच्या दारात येत होते. म्हणून फिर्याद शब्बीर यांनी याबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरुन शिवीगाळ करुन शब्बीर यांना खाली पाडून लाकडाच्या तुकड्याने पाठीत मारहाण केली. यावेळी त्यांची पत्नी सोडवण्यासाठी गेली असता तिलाही धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये दोघेही जखमी झाले.
शब्बीर भाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हशमत भाटकर, निजार भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button