‘त्या’ बॅग कोणासाठी? निलेश राणेंचा खासदार राऊत यांना सवाल

रत्नागिरी : निवडणूक असो वा कार्यक्रम, शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांना ‘बॅग‘ द्याव्या लागतात, असा गंभीर आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्यानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले असून विनायक राऊत यांनी कोकणाचे नाव खराब केले आहे, असा घणाघात करत त्या बॅग नेमक्या कोणासाठी होत्या हे सांगा? असे ट्विट त्यांनी केले आहे.
कोल्हापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. त्याचे पडसाद कोल्हापूर येथे उमटले असतानाच राजेश क्षीरसागर यांनीही जोरदार पलटवार करताना विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप
केले आहेत.
विनायक राऊत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. कोणताही कार्यक्रम असो त्यांची ’बॅग’ तयार ठेवावी लागते अशी टीका क्षीरसागर यांनी केली आहे.
यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले असून ट्विटद्वारे त्यांनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी ? हे विनायक राऊत यांनी स्पष्ट करावे, असे नीलेश राणेंनी ट्विट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button