![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2022/07/08DD7C6C-1387-43AA-96E7-EE57784E3CC1.jpeg)
महामार्गावरील खड्डे भरले नाहीत म्हणून शिवसेनेने केले सावर्डे येथे महामार्गावरील खड्ड्यात भात लावणी आंदोलन
मुंबई-गोवा राष्ट्रीय खड्डे भरले नाहीत म्हणून शिवसेनेने सावर्डे येथे महामार्गावरीलबखड्ड्यात भात लावणी आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वालोपे ते सावर्डे दरम्यान मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याची मागणी संदिप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. आठ दिवसात खड्डे न बुजविले गेले तर खड्यांमध्ये भात लावणी करेन असा इशारा सावंत यांनी दिला होता. तरी देखील प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत.यामुळे संतप्त शिवसैनिकांनी काल अनोखे आंदोलन करत खड्यातच भात लावणी केली. महामार्गावरील या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे येत्या पंधरा दिवसात खड्डे न बुजवले गेल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे
www.konkantoday.com