
शिवसेनेचे नवे नियुक्त पदाधिकारी पद स्वीकारणार तयार नसल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली
रत्नागिरीच्या शिवसेना मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टोमणे मारत टीका करून मेळाव्यात टाळ्या मिळवल्या होत्या त्यावेळी त्यांनी रत्नागिरी विधानसभामतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अभिनंदनही केले होते मात्र राऊत यांची पाठ फिरताच रत्नागिरी दौर्यावर आलेले माजी मंत्री उदय सामंत त्यांच्या स्वागतासाठी अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते ,माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यानंतर शिवसेनेकडून सामंत समर्थक असलेल्या पदाधिकार्यांना बाहेरचा रस्ता दाखवत नव्या पदाधिका यांच्या नेमणुका जाहीर केल्या होत्या या नेमणुका जाहीर होताच उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या प्रकाश रसाळ यांनी प्रकृती व कौटुंबिक अडचणींमुळे आपण पद स्वीकारणार नसल्याचे लेखी पत्राद्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके यांना कळवले होते त्यापाठोपाठच तालुका युवा संघटक म्हणून नेमणूक झालेल्या वैभव पाटील यांनीदेखील शिवसेनेकडून त्यांच्या करण्यात आलेल्या नियुक्ती पदाचा राजीनामा
दिला त्यांनीदेखील कौटूंबिक अडचणींमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आमदार सामंत व समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या शिवसेनेच्या व्यूहरचनेला माेठा फटका बसला आहे तसेच शिवसेनेकडून नव्या नियुक्ती करताना संबंधितांची मते विचारात घेतली जात नसल्याचे त्यांचा राजीनामा सत्रामुळे स्पष्ट होत आहे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नियुक्त्या होऊनही नवे नियुक्त पदाधिकारी पद स्वीकारण्यास तयार हाेत नसल्याचे नवे वेगळे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे आता नियुक्त केलेले पदाधिकारीपद स्वीकारत नसल्याने शिवसेनेकडून नव्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून अँडव्होकेट सुजीत कीर यांची नव्याने नेमणूक जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे गेली काही वर्षे माजी मंत्री उदय सामंत यांच्या बरोबरीने फिरणारे खासदार विनायक राऊत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत आमदार सामंतांना रोखणार की कसे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे
www.konkantoday.com