
सर्वच क्षेत्रात प्रगती गतिमान करणारा युवकांना संधी देणारा अर्थसंकल्प. – ॲड. दीपक पटवर्धन.
देशाला जागतिक स्तरावर अग्रनामांकित करण्याच्या प्रयत्नांना गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी क्षेत्रासाठी भरभरून संधी उपलब्ध करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. याची काळजी या अर्थसंकल्पात दिसते. युवा वर्गाला रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अनेक योजना असणारा हा अर्थसंकल्प आहे. ५०० कंपन्यांमध्ये ॲप्रेन्टीस म्हणून युवकांना रोजगार संधी व ६००० रु. स्टायपेंड .तसेच मुद्रा कर्जाची मर्यादा वाढवली. मुद्रा कर्जाची मर्यादा २० लाख करण्यात आली ,ऐंजल टॅक्स रद्द केला. ३०० युनिट वीज मोफत देण्यासाठी प्रावधान बनवलं. शहरी भागात १ कोटी घर निर्माण करण्याचा वायदा असलेला हा अर्थसंकल्प. आयकरामध्येही उत्पन्नाच्या वर्गवारी करून त्यावर वेगवेगळ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात येणार आहे. स्टॅन्डर्ड डीडक्शनमध्ये वाढ करून ती मर्यादा ५० हजार वरून ७५००० करण्यात आली आहे. ही बाब मध्यमवर्गीयांसाठी स्वागतार्ह ठरणार आहे. औद्योगिक क्षेत्राचा विचार करता १२ औद्योगिक कॉरीडौर उभारण्याचा निर्णय या बजेटमध्ये आहे. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याची महत्वपुंर्ण गोष्ट या अंदाज पत्रकात अधोरेखित केली आहे. मोदी शासनाची धोरणे आणि विकसित भारत संकल्पना सत्यात उतरवण्यासाठीचा रोड मॅप असा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया स्वरूपानंद पत संस्थेचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक अँड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.