नातुंडे येथे जमिनीच्या वादातून मारहाण

रत्नागिरी: तालुक्यातील नातुंडे येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून शेजारील दाम्पत्याला दगडाने मारहाण करून दुखापत केली. ही घटना रविवारी दुपारी 1 वा. घडली असून पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित सुभाष जाधव, लीला सुभाष जाधव(दोन्ही रा.नातुंडे, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बहीण भावाची नावे आहेत. त्यांच्या विरोधात लहू गंगाराम जाधव (48,रा.नातुंडे, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे सर्व एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात पूर्वीपासून वडिलोपार्जित जागेवरून वाद सुरु आहेत.यातूनच रविवारी त्यांच्या वाद झाला असताना संशयितांनी लहू जाधव आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत दगड मारण्यास सुरुवात केली. यातील एक दगड लहू जाधव यांच्या डोक्याला लागून दुखापत झाली आहे.अधिक तपास महिला पोलीस नाईक गुरव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button