जिल्ह्यात आरटीईच्या 373 हजार जागा रिक्त
रत्नागिरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतून 77 हजार 967 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही 24 हजार 39 जागा रिक्त असून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना अद्यापही नावाजलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शाळांमधील 94 शाळांमध्ये आरटीईच्या तब्बल 914 जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 1 हजार 41 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. दिलेल्या मुदतीत 541 विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला आहे. त्यानंतर पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले आणि प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. असे असतानाही पालकांचा प्रतिसाद न लाभल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. परंतु, तरीही प्रवेश घेण्यासाठी प्रतिसाद अल्प लाभल्याने आतापर्यंत केवळ 541 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे अजूनही जिल्ह्यात आरटीईच्या 373 हजार जागा रिक्त आहेत. आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. राज्यात अजूनही 24 हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढीची शक्यता आहे.