चिपळूण शहरातील श्री जुना कालभैरव देवस्थानची 20 जुलै रोजी किरका मिरवणूक

चिपळूण : चिपळूण शहराचे जागृत श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे वार्षिक किरका (जत्रा) मिरवणूक 20 जुलै रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या कालावधीत चिपळूण शहराच्या चतु:सीमेत सवाद्य फिरणार आहे. श्री ग्रामदैवत जुना कालळभैरव मंदिरात दुपारी 2.15 वाजता किरकेचा मांड भरणे धार्मिक विधी नंतर मंदिरातून दुपारी 3 वाजता किरका (जत्रा) मिरवणूक सवाद्य निघून चिपळूण शहराच्या चतुःसीमेत फिरल्यानंतर सायंकाळी 6 च्या दरम्यान श्री दत्त मंदिर, खेर्डी समोरील चिपळूण शहराच्या दक्षिण सीमेवर या किरका (जत्रा) मिरवणुकीची सांगता होईल. याची नोंद घेऊन देवस्थानचे समस्त मानकरी , सेवेकरी , भैरवसेवक, कार्यकर्ते आणि भक्तगण नागरिक यांनी भाविकपणे सहभागी व्हावे व आवश्यक सहकार्य करावे. किरका निमित्ताने श्री जुना कालभैरव देवस्थान संबंधित अशा चिपळूण शहरातील पारंपरिक मंदिरे , देवस्थाने, दर्गे , पीर आदींच्या गुरव, पुजारी, मुल्लाजी यांनी आपल्या देवस्थानचा, मंदिराचा, दर्ग्याचा, पिराचा नैवेद्य शिधा मंगळवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत श्री ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिरातून स्वीकारावा, असे आवाहन श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button