
शिवसेनेने नेमणूक केलेले उपजिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांचा पद स्वीकारण्यास नकार
शिवसेनेकडून नवे उपजिल्हाप्रमुख म्हणून जाहीर करण्यात आलेले प्रकाश रसाळ यांनी हे पद स्वीकारण्यास असमर्थता दाखविली आहे
याबाबत त्यांनी साध्या पेपरवर शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना पत्र लिहिले असून दैनिक सामनामधून आपले शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड जाहीर केल्याबद्दल आपल्याला आनंद झाल्याचे सांगितले परंतु आपल्या प्रकृती मुळे व कौटुंबिक समस्यांमुळे मला या पदाला न्याय देता येणार नाही त्यामुळे आपण हे पद स्वीकारू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे या पत्राची एक प्रत शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना देण्यात आली आहे त्यामुळे शिवसेनेला परत एकदा धक्का बसला आहे
www.konkantoday.com
