राजापूर तालुक्यातील 86 कुटुंबातील 283 जणांचे स्थलांतर
राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये झालेले भूस्खलन आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस यामध्ये होणारे संभाव्य भूस्खलन वा डोंगर खचण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनाने राजापूर तालुक्यातील 86 कुटुंबातील 283 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजापूर तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे चारशे मी. मी. पाऊस कमी पडल्याची नोंद झाली आहे. असे असले तरी, तालुक्यातून वाहणार्या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येऊन त्या पुराच्या पाण्याचा शहराला काही दिवस वेढाही पडलेला होता. गेले महिनाभर पडलेल्या पावसाचा फटका बसूून तालुक्यातील 28 घरे, एक गोठा, अंगणवाडी अन् शाळेच्या इमारतीची पडझड झाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी पावसाचा वेळेत शुभारंभ झाला. यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. मात्र, जूनअखेरपासून संततधार पाऊस कायम राहिला. पावसाचा कमी-जास्त जोर राहिला आहे.