
गिम्हवणे येथून प्रौढ बेपत्ता
दापोली : गिम्हवणे येथून निलेश सकपाळ ( वय ४६) हा इसम घरातून बेपत्ता झाल्याची घटना सोमवार दि. ११ जुलै रोजी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश सकपाळ हे सोमवारी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे कामावर गेले होते. तेथून ते जेवणाच्या सुट्टीत बाहेर पडले. त्यानंतर ते पुन्हा कामावरही गेले नाहीत व घरीही परतले नाहीत. त्यांचा आजूबाजूला शोध घेतला असता ते कोठेही आढळून आले नाहीत, म्हणून पत्नी निकिता सकपाळ यांनी दापोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. हा इसम कोणालाही आढळून आल्यास तत्काळ दापोली पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली सुकाळे करीत आहेत.