
*कोकण रेल्वेचा महिनाभरात ९,५४८ प्रवाशांवर कारवाईचा बडगा*
___कोकण रेल्वेतूनप्रवास करताना जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल २ कोटी १७ लाख ९७ हजार १०२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.नव्या वर्षात फुकट्या प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे.गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विनातिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी ऑगस्ट २०२३ या महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते. जानेवारी या महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८ प्रवाशांकडून २,१७,९७,१०२ रूपयांचा दंड वसूल केला आहे. ऑगस्ट २०२३ पासून ही मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रत्येक महिन्याला करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत ३७,३८६ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ७,०५,८२, २५४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.www.konkantoday.com