
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त रोजगार मेळावा
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै 2022 चे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगाव, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे दामले, आरती देसाई हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनुजा शेख यांनी केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुळकर्णी यांनी स्वयंरोजगाराबाबत शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत विशेष असे मार्गदर्शन उपस्थित उमेदवारांना करून व्यवसाय सुरू करण्याबाबत देखील आवाहन करण्यात
आले.
रोजगार मेळाव्याकरिता एकूण 300 हून अधिक रिक्त पदांसाठी किमान 375 ते 400 उमेदवारांनी याचा लाभ घेतला. या रोजगार मेळाव्यात विविध आस्थापनांच्या 10 उद्योजकांनी सहभाग दर्शवून उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये 143 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाकरिता बिटोडे, सावके, गिम्हवणेकर, घोसाळे, लोंढे, सोनम पवार तसेच महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे स्वप्नील सावंत, कोतवडेकर यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोंढे यांनी
केले. या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद लाभला. नवनवीन कार्यक्रमांची माहिती यावेळी घेतली. या कार्यक्रमासाठी कर्मचार्यांचे सहकार्य
लाभले.