गुन्हे उघडकीस आणणार्‍या विलास जाधव यांचा पोलिस अधीक्षकांनी केला सत्कार

रत्नागिरी : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील अंमलदार विलास जाधव यांनी गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
गुंतागुंतीचा तपास करताना पोलिसांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच बाहेर राज्यातील गुन्हेगारांना, खुनातील आरोपींना अटक करताना वेगवेगळ्या राज्यात जीवाची जोखीम पत्करून जावे लागते. सायबर क्राईमचा तपास गुंतागुतीचा असतो. यामधील गुन्ह्यांचे आरोपीही चलाख असतात. परंतु त्यांना जाधव यांच्यासारखे अनुभवी पोलिसच बेड्या ठोकत असतात. त्यामुळेच त्यांच्या कामाची पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दखल घेतली.
खुनातील आरोपी,  खुनाचा पुरावा नाहीसा करणारे आरोपी, अपघातातील आरोपी यांसारख्या विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची उत्तम कामगिरी केल्याबद्दल मोहीतकुमार गर्ग यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. विलास जाधव हे 15 वर्ष पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button