
आमदार उदय सामंत यांचा रत्नागिरी शहरात शिवसेनेला दे धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या उठावात सामील झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आमदार उदय सामंत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले विशेष म्हणजे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निष्ठावंत मेळाव्यात हजर असलेल्या काही शिवसेना कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे स्वागत करण्यासाठी पुढाकार घेतला शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्यासह रत्नागिरी नगर परिषदेचे अनेक माजी नगरसेवक विश्रामगृहावर उपस्थित होते विशेष म्हणजे दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनीही शिवसेनेच्या मेळाव्यात उपस्थित असलेल्या नव्वद टक्के लोकांनी तुमची भूमिका बरोबर असल्याचे सांगितले असल्याचे स्पष्ट केले होते आमदार सामंत हे आपण अजूनही शिवसेना सोडली नाही तर शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट करीत आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांची संख्या वाढत आहे रत्नागिरी येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच सामंत यांना पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे येत्या काही दिवसांत आमदार सामंत हे शिवसेनेला दे धक्का देणार हे स्पष्ट आहे
www.konkantoday.com