
सामंतांच्या बंडानंतर जुने शिवसैनिक मैदानात
आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेतील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नाराज असलेल्या जुने शिवसैनिक मैदानात उतरल्याचे चित्र आता दिसत आहे . गेले आठ वर्ष शिवसेनेतील सक्रीय राजकारणापासून दूर असलेले माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अचानक पक्षात सक्रीय झाल्याचे पहायला मिळाले. रविवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात अनेक जुन्या शिवसैनिकांनी हजेरी लावत आपल्या भावना उघडणपणे व्यक्त केली. खासदार विनायक राऊत यांनीही आपलीही घुसमट होत असल्याचे उघडपणे बोलून दाखवले.
आ. उदय सामंत शिवसेनेत असताना त्यांच्या कायम सोबत असलेल्या व त्यांच्या हो ला हो देणार्या खासदार विनायक राऊत यांनी आपलीही घुसमट होत असल्याचे मेळाव्यात सांगितले आता मुक्तपणे काम करू या असे शिवसैनिकांना सांगितल्याने पक्ष सचिवांवर अशी वेळ आली होती.त्यामुळे आता जोमाने काम करू, असे मेळाव्यात बोलताना सांगितले. त्याला अनेक शिवसैनिकांनी दाद दिली होती. www.konkantoday.com