गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! उद्यापासून रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरु, असे आहे नियोजन!

मुंबई :* गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गणेशोत्सवासाठीचे आरक्षण सुरू होणार आहे. यंदा गणरायाचे आगमन बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. आगमनाआधीचा शुक्रवार-शनिवार-रविवार अनुक्रमे २२, २३ आणि २४ ऑगस्ट असा आहे. या दिवसांच्या रेल्वे प्रवासासाठीचे आरक्षण उद्या, २३ जूनपासून खुले होणार आहे.*रेल्वेला प्राधान्य*महामुंबईतील लाखो नागरिक गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळ गावी जातात. उत्सवानिमित्त जादा एसटी, खासगी एसटी चालवण्यात येतात. कोकणात रस्ते मार्गाच्या तुलनेत रेल्वे प्रवास आरामदायी, स्वस्त आणि वेगवान असतो. यामुळे कोकणवासीयांकडून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते.

प्रवास तारीख —आरक्षण खुले होण्याची तारीख शुक्रवार, २२ ऑगस्ट —सोमवार, २३ जूनशनिवार, २३ ऑगस्ट —मंगळवार,२४ जूनरविवार, २४ ऑगस्ट —बुधवार, २५ जूनसोमवार, २५ ऑगस्ट —गुरुवार, २६ जूनमंगळवार, २६ ऑगस्ट —शुक्रवार, २७ जूनबुधवार, २७ ऑगस्ट —शनिवार, २८ जूनगुरुवार, २८ ऑगस्ट —रविवार, २९ जून

रेल्वेगाडी कोणत्या स्थानकावर पोहोचली आहे हे पाहण्यासाठी ‘नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम’ (एनटीईएस) आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल ॲप डाउनलोड करावे. यात रेल्वेगाडीचे लाइव्ह लोकेशन, मार्गावरील नकाशा, रेल्वे वेळापत्रक, थांबे आणि मार्गादरम्यानचे स्थानक अशी माहिती उपलब्ध आहे.

तिकीट काढताना गाडी सुरुवातीच्या स्थानकातून सुटण्याचा दिवस गृहीत धरावा. उत्तर आणि दक्षिण भारतातून सुटणाऱ्या गाड्यांचे महाराष्ट्रातील स्थानकांपासूनचे आरक्षण एक दिवस आधी करावे लागते. दि. २६ ऑगस्ट, २०२५ला १२६१८ हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसने कल्याण ते खेड/चिपळूण/कणकवलीपर्यंत प्रवास करायचा असल्यास २६ जून २०२५ ला आरक्षण सुरू होईल. त्याचप्रमाणे ३ सप्टेंबर २०२५ला १२६१७एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसने किंवा १६३४६ तिरुअनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसने कुडाळ/रत्नागिरी/संगमेश्वर/चिपळूण/खेड ते पनवेल/कल्याण/मुंबईपर्यंत प्रवास करायचा असल्यास ४ जुलै, २०२५ ला आरक्षण सुरू होईल.

रात्री १२नंतर दिवस बदलतो. त्यामुळे मध्यरात्रीच्या गाड्यांसाठी पुढील दिवसाचे तिकीट काढावे. गुरुवारी रात्री ११००३ दादर- सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसने किंवा ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्स्प्रेसने जायचे असल्यास शुक्रवारचे तिकीट काढावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button