राजापूर अडिवरे येथील ग्रामीण भागात तयार झालेली ही चप्पल थेट लंडनला पाेहाेचली

रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे (ता. राजापूर) या ग्रामीण भागात तयार झालेली चप्पल थेट लंडनला पाेहाेचली आहे. आडिवरे गावातील सुनील सूर्यकांत आडिवरेकर या तरुणाने तयार केलेली ही चप्पल सातासमुद्रापार पाेहाेचली आहे.
आडिवरे येथे सुनीलचे वडील सूर्यकांत आडिवरेकर यांचे छाेटेसे दुकान आहे. वडिलांसाेबत दुकानात येता येता चप्पल तयार करण्याची कला त्याला आकर्षित करू लागली. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी त्याने वडिलांबराेबर व्यवसायाला सुरुवात केली. गाव छाेटेसे असल्याने गावात राहून आपल्या कलेचे चीज हाेणार नाही, असे मनात ठरवून त्याने मुंबई गाठली. मुंबईत आपले बस्तान बसवीत असतानाच वयाच्या २५ व्या वर्षी वडिलांचे अकाली निधन झाले.
मुंबईत काम करताना त्याने काेल्हापुरी चप्पल तयार करण्यास सुरुवात केली. त्याने बनविलेली पहिली चप्पल मुंबईतील वरळी भागात गेली त्याचवेळी साेशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ अपलाेड झाला आणि हा व्हिडीओ पाहून दिल्लीतून पहिली ऑर्डर आली. त्यानंतर हैदराबाद याठिकाणी त्याने चप्पल पाठविली.
साेशल मीडियावरील व्हिडीओ पाहून लंडन येथील रतन जयस्वाल नावाच्या व्यक्तीने सुनीलशी संपर्क साधून चप्पलची मागणी केली. त्याने आडिवरे येथून ही चप्पल मुंबईतील अंधेरी येथे पाठविली असून, तेथून ती लंडनच्या दिशेने रवाना झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button