प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत
रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2022 करिता या योजनेत सहभागाची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2022 असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी सुनंदा कुर्हाडे यांनी कळविले आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळ यावरुनही ऑनलाईन अर्ज करता येईल. पीकासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार, पिक लागवड नोंदणी प्रमाणपत्र, शेतकर्यांनी सातबारा उतारा, आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचे तपशील सोबत जोडणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.