
बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा शहरातील एका किराणा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा शहरातील एका किराणा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहेसदर व्यापाऱ्याने पंचवीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद वरेंद्र प्रदीप सुर्वे (३९ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३२, सातवा माळा, बिल्डिंग एम – १, को – ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कशिश पार्क ठाणे ) यांनी याबाबतची लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. लांजा येथे किराणा व्यावसाय करणारा व्यावसायिक (रा. लांजा खावडकरवाडी) याने दि. १५ जून रोजी सकाळी ९.०२ ते ९.०६ या कालावधीत लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या ५१ अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करून बँकेची आर्थिक फसवणूक केली www.konkantoday.com