खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालयात आता स्थलांतरित होणार

आमदार उदय सामंत यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेना विरूद्ध आ. उदय सामंत गट यांच्यात शीतयुद्ध पेटू लागले आहे. रविवारी शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी आ. सामंत यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर आ. सामंत गट आक्रमक झालेला असतानाच आता आ. सामंत यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रिकामे करण्यात आले आहे. मंगळवारी साहित्यांची बांधाबांध कर्मचारी करीत होते. आता शिवसेनेचे मुख्य सचिव तथा खासदार विनायक राऊत यांचे कार्यालय आता आठवडा बाजार येथे शिवसेना कार्यालयाजवळ हलवण्यात येणार असल्याचे कळते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button