‘ओएलएक्स’वरील जाहिरातीतून रत्नागिरीतील तरुणीला सुमारे 72 हजारांची फसवणूक

रत्नागिरी : ओएलएक्सवरील जाहिरात पाहून फसवणूक झाल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला आहे. गुगल पे वर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून 71 हजार 800 रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना मंगळवार 12 जुलै रोजी दुपारी 1.34 वा. साळवी स्टॉप येथे घडली. यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम पांडये असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. मृण्मयी कृष्णा पेवेकर (वय 29, राहणार साळवी स्टॉप, रत्नागिरी )यांनी तक्रार दिली आहे. आयपॅड खरेदी करण्यासाठी ओएलएक्सवर नोंद केली. आयपॅड सेकंड हॅन्ड असल्याने 24 हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरलेले असताना शिवम पांडयेने गुगल पे वर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून 71 हजार 800 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button