हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी डॉ. पाटील
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणारा ‘हर घर तिरंगा’ उपक्रम जिल्हातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणार्या हर घर तिरंगा उपक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा शल्य चिकित्सव डॉ. संघमित्रा फुले, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, नगरपालिका प्रशासनचे तुषार बाबर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व्ही. सी. जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रां.पं.) श्री. देसाई, सां. बा. उत्तर रत्नगिरीचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर,जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी बैठकीला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभर 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक नागरिकांच्या घरावर, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणीक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हयातील प्रत्येकापर्यंत पोहचण्यासाठी मोठया प्रमाणावर जाणीव जागृती करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाल, तालुकास्तरावर प्रांतधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सामाजिक कार्येकर्ते, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आदिंची बैठक घेऊन या मोहिमेबाबत जाणीव जागृती करा.