
खेड नगरपालिकेला मुख्याधिकारी लाभले, मुख्याधिकारी पदी महादेव रोडगे
खेड नगरपरिषदेत प्रभारी मुख्याधिकार्यांचा कारभार आता संपुष्टात येणार आहे. येथील नगरपरिषदेचा कार्यभार पुन्हा महादेव रोडगे यांच्याकडे सेपविण्यात आला आहे. ते सद्यस्थितीत ठाणे महानगरपालकेत उपायुक्त पदावर कार्यरत होते. मात्र त्यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाल्याने कायमस्वरूपी मुख्याधिकार्यांची येथील प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.राोडगे यांनी यापूर्वी येथील नगरपरिषदेत मुख्याधिकारीपदाचा कार्यभार सांभाळला होता. उत्तम प्रशासक असलेल्या महादेव रोडगे यांनी विकासकामांना चालना देण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करत लोकाभिमुख कामे करण्यावर भर दिला होता. त्यांच्या कारकिर्दीत शहरात अनेक महत्वपूर्ण विकासकामे देखील मार्गी लागली होती. यानंतर त्यांची दापोली नगरपंचायतीत बदली झाली होती. www.konkantoday.com