केंद्रातील भाजप सरकारला म्हणे कोकण कर्नाटकाला द्यायचे आहे -खासदार विनायक राऊत यांचा नवा दावा
सध्या शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे शिवसेनेने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत मेळावा झाला यामध्ये शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर केलेली आघाडी कशी योग्य असल्याचे सांगितले बाहेर पडलेल्याना पुन्हा प्रवेश नसल्याचे सांगून आता चिकटलेली गोचिड गेल्याचेही सांगितले रत्नागिरीत शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी पूर्वीचे शत्रू असलेले राष्ट्रवादी काँग्रेस कितीही चांगले मित्र असल्याचे व त्यानी औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराला विरोध कसा केला नाही असे सांगितले हे करत असताना केंद्रातील सरकारचा महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव असल्याचे सांगितले यावेळी कार्यकर्त्यांसमोर राऊत यांनी जोरदार भाषण केले राऊत यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की केंद्रातील सत्ताधाऱ्यांना म्हणजे भाजपला मुंबईची वाट लावायची आहे मुंबई गुजरातला द्यायची आहे केंद्रशासित करायची आहे
असाही आरोप केला याआधी मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव असल्याबाबत शिवसेनेकडून असे आरोप याआधी सतत केले जात होते त्यामुळे राऊत यांनी मांडलेल्या या विचारांबाबत काही वेगळे वाटले नाही मात्र त्यानंतर आपल्या भाषणात राऊत यांनी केंद्रातील सरकारला कोकण कर्नाटकला द्यायचा आहे असाही आरोप केला मात्र राऊत यांनी कोकण कर्नाटकला देण्याचा हा शोध कधी व कसा लावला याचं कोडं आता कोकणवासीयांना पडल आहे
www.konkantoday.com