
आजाराला कंटाळून मढाळ येथे विवाहितेची आत्महत्या
गुहागर : मानसिक आजाराला कंटाळून एका विवाहितने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अनुश्री संतोष चव्हाण (40, रा. मढाळ) असे या विवाहितचे नाव आहे. या घटनेबाबत मनोज बाळकृष्ण चव्हाण यांनी गुहागर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार अनुश्री चव्हाण यांना मानसिक आजार होता. त्या आजारावर औषधोपचारही सुरु होते. शनिवार, दि. 9 जुलै रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास घरामधील बेडरुमच्या सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुहागर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नलावडे करीत
आहेत.