
रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 21 रोजी भरती मेळावा
रत्नागिरी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे 21 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा होणार आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पाचवी, दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारानी मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे अंशकालीन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांनी कळविले आहे.