शरद पवारांसह उद्धव ठाकरेंना फसवणाऱ्या गद्दारांना सेना परिवारात आता प्रवेश नाही : रत्नागिरीतील मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांची आ. सामंत यांच्यावर टीका
रत्नागिरी : राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेऊन शिवसेनेत येताना उदय सामंत यांनी खा. शरद पवारांच्या तोंडाला यांनी पाने पुसली. मातोश्रीवर जेऊनही त्याची जाण सामंत यांनी ठेवली नाही. उध्दव ठाकरेंनी विश्वास ठेवून त्यांना आपलेसे केले. परंतु यांनी विश्वासघात केला. गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नाही, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात आ. उदय सामंत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेकडून रत्नागिरीत निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. राऊत बोलत होते. रत्नागिरी येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला आमदार व शिवसेना उपनेते राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रदीप बोरकर, उदय बने, राजू महाडिक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले,
रत्नागिरी हा सेनेचा बालेकिल्ला आहे. हे दाखवून देण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा. शिवसेनेने अशी कितीतरी बंडे पाहिली आहेत. त्यामुळे तुम्ही गेला तरी काही फरक पडणार नाही. सेनेचा धनुष्य हिसकावण्याचा प्रयत्न करणारी औलाद परत निवडून येणार नाही. गद्दारीची पार्श्वभूमी असलेल्यांचे भविष्य उज्वल नसल्याचेही खा. राऊत म्हणाले. शिवसेनेने अशी किती बंडे पाहिली आहेत. त्यामुळे तुम्ही गेलात तरी काही फरक फडणार नाही. सेनेचा धनुष्य हिसकावण्याचा प्रयत्न करणारी औलाद परत निवडून येणार नाही, अशी तोफ खा. राऊत यांनी डागली.